प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
निमगाव खंडोबा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी खंडू नारायण खैरे यांची आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार 2022 /23 साठी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने शासन निर्णयाने आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराची प्रत्येक वर्षी निवड समितीच्या वतीने निवड करण्यात येते. पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने सन 2021/ 22 तसेच सन 2022/ 23 व सन 2023/ 24 या वर्षांसाठी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराची निवड करण्यासाठी सर्व विकास गटातून प्रस्ताव या कार्यालयात मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेमध्ये सन 2021/22, सन 2022/ 23 व सन 2023/ 24 या कालावधीचे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराची नावे जाहीर करण्यात आली.त्यात श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री खंडू नारायण खैरे यांची 2022 / 23 साठी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार साठी निवड करण्यात आली. श्री खंडू नारायण खैरे हे निमगाव खंडोबा येथील ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना निमगाव खंडोबा ग्रामपंचायत आदर्श करण्यासाठी खारीचा वाटा उचलत असुन ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणी पट्टी वसुली ही ग्रामस्थांना विश्वासात घेऊन 100% करत आहेत. निमगाव खंडोबा येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहत असताना ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या सर्व व्यक्ती बरोबर ते आदराने वागत असतात. त्यांनी गावात अनेक विकास कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे. त्याच प्रमाणे निमगाव खंडोबा मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी 56 कोटी रुपये मंजूर झाले असून संपूर्ण आराखडा तयार करणे व गावातील विविध विकास कामांमध्ये त्यांचे चांगले योगदान असते .ते वेळोवेळी सर्व ठराव मागणी पत्र अनेक गोष्टींसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणे अशी अनेक कामे त्यांनी निमगाव खंडोबा या ठिकाणी रुजू झाल्यापासून केलेले आहे. शासनाने वेळोवेळी सर्व सामान्य माणसांसाठी जाहीर केलेल्या योजना सर्व सामान्य माणसां पर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.त्यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार 2022/23 मिळाल्याबद्दल त्यांचे निमगाव खंडोबा ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच मित्र परिवारांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
Share this content:
