

प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
खरपुडी ता. खेड येथील के.डी. चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सालाबाद प्रमाणे कृष्णा जन्माष्टमीचा उत्सव थाटामाटाने साजरा करण्यात आला. कृष्ण जन्मासाठी सजवलेला पाळणा, त्यापुढील रांगोळी, नटून थटून राधा कृष्णाच्या वेशभूषेतील मुले मुली, सर्वांचे आकर्षण ठरल्या.
स्कूलच्या प्रांगणामध्ये विद्यार्थी सहभागातून दहीहंडीची तयार केलेली प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा.के. डी. चौधरी पाटील. व सौ आशालाता चौधरी पाटील यांनी कृष्ण मूर्तीचे व कलशाचे पूजन केले, वाद्यांच्या तालात विद्यार्थ्यांनि सुमधुर आवाजात कृष्ण जन्माच्या पाळण्याचे गायन केले, उंच बांधलेली आणि सजवलेली दहीहंडी जेव्हा मुलींच्या गोविंदा पथकाने फोडली तेव्हा पाहणाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले,दहीहंडी फुटताच स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी स्कूलच्या प्रांगणात फिरकू लागले. गोविंदाच्या गाण्यावर मनसोक्त नृत्य करणारी स्कूलची मुले व मुलींच्या फुगड्या यामुळे स्कूलच्या प्रांगणामध्ये गोकुळ अवतरल्यासारखे वाटत होते.स्कूलच्या दहीहंडी उत्सवात स्कूलच्या व्हा . प्रिन्सिपल सौ रोहिणी गव्हाणे, सौ. विमल ढोकले पाटील.स्कूलचे सुमारे 900 विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने पालक सहभागी होते.

Share this content:
