

प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
आज सायंकाळी पाच वाजता दौंडकर वाडी रामनगर येथे शेतकरी भरत शिवराम लांडे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्या ने हल्ला केला गोठ्यातील सोळा शेळ्यांची पिल्ले बिबट्याच्या हल्यात मुत्युमुखी पडली,यावेळी चाकण वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली असता वनपाल पवन आहेर, वनरक्षक सागर चव्हाण रावसाहेब चौरे अनिल खांडेकर,यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.शेतकरी शेळ्या रानात चारण्यासाठी गेले असता पाठीमागे बिबट्यांनी हल्ला केला.या हल्यात सुमारे दिड लाखांचे नुकसान झाले असून.दौडकरवाडीचे सरपंच सिताराम गुजर यांनी वनखात्याच्या अधिकारी यांना सांगितले की बिबट्या चार शोध घेऊन बिबट्या चार बंदोबस्त करावा, दौंडकर वाडी रामनगर येथे बिबट्या मुळे भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे,तसेच सरपंच यांनी वनखात्याच्या अधिकारी यांना सांगितले की शेतकरी भरत लांडे यांना वनखात्याने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी.
Share this content:
