


प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
श्रुती आयकॉन मध्ये पहिल्या वर्षी गणेश उत्सव साजर करण्यात आला.श्री गणेशाच्या आगमन आपल्या जीवनाचे उत्साह नवीन उमेद आणि सकारात्मक ऊर्जा भरून राहो श्रुती आयकॉन ने पहिला वर्ष मोठ्या उत्साहाने साजरा केला.भजन मंडळ सांस्कृतिक कार्यक्रम संगीत खुर्ची इत्यादी उपक्रमामध्ये सर्व महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला व सोसायटीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.आपण सर्वांनी मिळून गणपती बाप्पाची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी केली. प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवून हा क्षण अविस्मरणीय केला. आपल्या संस्कृतीला वर्षानुवर्ष पुढे नेण्याचे हे कार्य आपण सारे मिळून यशस्वी करत आहोत, याचा आनंद वाटतो.सर्व सदस्यांचा मनःपूर्वक आभार असे विक्रम पाटील यांनी सांगितले. हा कार्यक्रम अतिशय आनंदित वातावरणा मध्ये संपन्न झाला. सर्व सभासदांचे व सदस्यांचे आभार श्री वाडेकर, श्री अनिल काला,श्री प्रशांत , श्री अभयसिंग, श्री थोरात, श्री विनोद चव्हाण, श्री शुभम शेंडगे, श्री विजय, श्री धीरज, श्री चंद्रकांत गवारी,यांनी परिश्रम घेतले.
Share this content:
