

प्रतिनिधी संतोष गाडेकर
राजगुरुनगर:- तालुका खेड येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पदस्पर्शाने पावन झालेल्या भीमा नदीच्या किनारी संत गोरा बा का का मंदिरात अश्विन कोजागिरी पौर्णिमा कार्तिक स्नान आरंभ ते कार्तिक त्रिपुरा पौर्णिमा कार्तिक स्नान समाप्ती पांडुरंग हरी राम कृष्ण हरी उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा अरुणा उदय झाला असा नाम घोष पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पहाटे पासून काकड आरती भक्ती भावनेतून आरती सोहळा पखवाद, मृदुंग टाळ एक स्वर एक ताल लय पद्धतीने भजन गायन यातून श्री. विठ्ठल रुक्माई मंदिरात काकड आरती केली जात आहे राजगुरुनगर शहरांमध्ये संत गोरोबाकाका मंदिर, श्री उद्धव शेठ कुंभार( अध्यक्ष) सर्व समाजाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये काकड आरती सुरू आहे सर्व समाजाचे समाज बांधव मंदिरामध्ये काकड आरती सोहळा संपन्न करत आहे राजगुरुनगर शहरांमध्ये मंदिरात आरती सोहळा सुरू आहे संत सेना महाराज मंदिर, गढ ई मैदान,संत नामदेव महाराज मंदिर, संत सावता माळी मंदिर, संत नरहरी सोनार , पांडुरंगा मंदिर राजगुरुनगर वेशी जवळ येथे काकड आरती सुरू आहे
सर्व महिला वर्ग ,वारकरी सांप्रदायिक वारसा जतन करणारे हरिभक्त भक्तगण उपस्थित राहत आहे राजगुरुनगर शहरांमध्ये सर्व संतांची मंदिरे आहेत मंदिरामध्ये उपस्थित राहणारे भक्त जणांसाठी काकड आरती सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात येत आहे
Share this content:
