

प्रतिनिधी-संदिप शितोळे
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा खंडोबा देवस्थान येथे बहुजन समाजातील बलुतेदार संघटनाच्या वतीने अनेक महत्वांच्या विषयांसाठी मिटींगचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी कलावंतांसाठी भव्य मेळाव्याचे नियोजन करण्याचे ठेवण्यात आले. तसेच लवकरच तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती पारनेर तालुक्याचे अध्यक्ष माननीय श्री. बाळासाहेब शिरतार यांनी दिली. त्यावेळेस कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून मोहन भाऊ साळवे उपाध्यक्ष मातंग संघ महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. तसेच श्री उत्तम वायदांडे सत्यशोधक बहुजन आघाडी जुन्नर तालुका अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्याच प्रमाणे श्री रामदास साळवे आधुनिक जय लहुजी वस्ताद पारनेर तालुका अध्यक्ष , श्री. गणेश पोपटराव शिरसागर सामाजिक कार्यकर्ते ,श्री प्रवीण क्षीरसागर जेष्ठ विचारवंत, श्री रवींद्र साळवे सामाजिक कार्यकर्ते, श्री राहुल भाऊ अल्हाट युवा संघटक पारनेर तालुका, श्री गणेश जेजुरकर सामाजिक कार्यकर्ते वडझिरे, श्री गणेश साळुंखे संपर्कप्रमुख बहुजन संघटना, श्री किरण नवगिरे ,श्री किरण ससाने, श्री चंद्रकांत चौधरी , श्री शाहीर शामराव शिंदे कोलठणकर, श्री पांडुरंग क्षीरसागर , श्री बारकू जेडगुले , श्री पकज माळी ,श्री समाधान शिंदे, चंद्रकांत चौधरी, श्री राहुल शिरसागर, श्री वैभव क्षीरसागर, राहुल शिरसागर, सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वमान्यवरांना भारताचे संविधान भेट म्हणून देण्यात आले.
Share this content:
