प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
वासुली : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्त वासुलीच्या वारकऱ्यांची संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर आळंदी येथे भजन सेवा महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार ह भ प नारायण महाराज काळे यांच्या माध्यमातून संपन्न झाली.
तळजादेवी भजनी मंडळ वासुली , जेष्ठ व युवा तरुण यांची संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर आळंदी येथे भजन सेवा संपन्न झाली. यामध्ये जेष्ठ गायक ह.भ.प. श्री मुरली आण्णा पाचपुते,श्री. खंडुनाना पाचपुते, श्री. एकनाथ जांभळे व युवा गायक ह.भ.प श्री. आकाश कावरे, श्री. लक्ष्मण जांभळे, श्री. अजित पाचपुते, श्री. प्रल्हाद पाचपुते, श्री. रामदास जांभळे यांनी संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर आळंदी येथे भजन सेवा केली. काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, समाधि घेतली आळंदी, माऊलींच्या अनेक अभंगातून त्यांनी सर्वांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले.
तबला वादक : कु. आयुष पाचपुते हार्मोनियम वादक:कु सिद्धी पाचपुते सहगायक : ह भ प श्री . मोहन पाचपुते, श्री. बबन पाचपुते, ह.भ.प.श्री. शिवाजी कावरे, ( अध्यात्मिक आघाडी बी.जे.पी.खेड तालुका ) श्री.किरण पाचपुते , श्री.नवनाथ पाचपुते, श्री.अरुण लिंभोरे, कु. श्रध्दा पाचपुते,कु.श्रावणी पाचपुते यांचे सहकार्य लाभले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या संजीवनी समाधी जवळ भजन करणे हे आमचे परम भाग्यच असे सर्व भजनी कलावंत वारकऱ्यांना वाटत होते. त्यांच्या साठी हा दिवस आजी सोनियांचा दिनु ||वर्षे अमृताचा धनु|| असा होता.
Share this content:
