

प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
सभापती विजयसिंह शिंदे हे पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटात उभे राहणार का? किंवा रेटवडी वाफगाव गटात गौरीताई विजय शिंदे यांना उमेदवार म्हणून उभे करणार का? या कडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्हा परिषद पुणेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले पिंपळगाव तर्फे खेड या गटात सर्वसाधारण जागा आली असून विजय सिंह शिंदे यांनी पिंपळगाव तर्फे खेड या जिल्ह्या परिषद गटातून निवडणूक लढवणार का ? किंवा रेटवडी वाफगाव गट हा सर्वसाधारण महीला राखीव असल्याने गौरीताई विजय शिंदे त्याना निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून उभे करणार आहेत का या कडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.दोन्ही गट निवडणूकी साठी सोईस्कर असुन त्यांनी निवडणूक जाहीर झाल्या बरोबर या दोन्ही गटात मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत. त्याच प्रमाणे निवडणूक जाहीर झाल्या बरोबर सौ.गौरीताई शिंदे यांनी दोनही गटात महीला बचत गट, नवरात्र उत्सवा निमित्त मंडळातील महीलांच्या भेटी गाठी घेऊन आपला ठसा उमटावला आहे.तसेच शिंदे परिवारचे नातेवाईक या दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात असल्याने व तरूण मित्र परिवार त्यांना मानणारा असल्याने त्यांना ही निवडणूक सोपी जाणार असल्याचे या गटात बोतले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा ते कायम प्रयत्न करत असतात.त्यांची थेट शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली असुन एखादा शेतकरी भेटला असता त्यांच्याशी आपुलकीने बोलणे व विचारपुस करणे या मुळे ते शेतकरी वर्गात पसंतीचा उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. विजय सिंह शिंदे यांचा स्वभाव स्मितहास्यी असल्याने नागरिक त्यांच्याशी आपुलकीने बोलत असतात.विजय सिंह शिंदे यांच्या विरोधात कोण उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोणीही उभे राहिले तरी यांना काहीही फरक पडणार नसुन ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे जाणकारांचे मत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ते दोन नंबरच्या मताधिक्याने निवडुन आल्याचे विसरून चालणार नाही असे जाणकारांचे मत आहे.
सर्वांच्या सुख दुःखात उपस्थित राहणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
Share this content:
