
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आजचा महापूजा व आरतीचा मान वासुली गावचे ह.भ.प.आकाशभाऊ कावरे , ह.भ.प.रामदास जांभळे व ह.भ.प.गुरुराज बुट्टे पाटील यांना मिळाला आहे.
खेड तालुक्यातील वासुली गावचे सुपुत्र व अध्यात्मिक क्षेत्राची आवड असणारे तसेच कायम स्वरूपी वस्तुरुपी तसेच आर्थिक मदत करणारे ह.भ.प.शिवाजी कावरे ( अध्यात्मिक आघाडी बी.जे.पी.खेड तालुका अध्यक्ष ) यांचे पुतणे ह.भ.प.आकाशभाऊ कावरे तसेच ह.भ
प.रामदास जांभळे व ह.भ.प.गुरुराज बुट्टे पाटील यांना आज पंढरपूर येथे विठुरायाची पुजा व आरती करण्याचा मान मिळाला. ह.भ.प.शिवाजी कावरे ( अध्यात्मिक आघाडी बी.जे.पी.खेड तालुका अध्यक्ष ) यांनी आनलाईन नोंदणी केली होती त्यामुळे त्यांना आज हा मिळाला होता. विठुरायाची पुजा करण्याचा मान आम्हाला मिळाल्याने आमच्या घरात आनंदी वातावरणात निर्माण झाले. या पूजेसाठी कावरे जांभळे व बुट्टे पाटील परिवार उपस्थित होते.पुजा करण्याचा मान आमच्या परिवारला मिळाल्याने आम्ही धन्य झालो असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 शी बोलताना ह.भ.प.शिवाजी कावरे ( अध्यात्मिक आघाडी बी.जे.पी.खेड तालुका अध्यक्ष ) यांनी व्यक्त केली. तसेच हा मान आम्हाला दिल्याबद्दल विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे आभार व्यक्त केले.
Share this content:
