
प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
खेड तालुक्याचे माजी आमदार ॲड साहेबरावजी बुट्टे पाटील यांच्या सुनबाई खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड देवेंद्रजी बुट्टे पाटील साहेब यांच्या धर्मपत्नी ॲड राजमालाताई बुट्टे पाटील महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांनी पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेली 50 60 वर्षांचे बुट्टे पाटील परिवाराचे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून तालुक्याच्या कानाकोपऱ्यात असलेले संबंध बुट्टे पाटील ताईंनी कोरोनाच्या काळामध्ये अनेक माता भगिनींना केलेली मदत व गेली अडीच तीन वर्ष लोकसभा आणि विधानसभेमध्ये तालुक्याच्या कानाकोपऱ्यात फिरून प्रचंड जनसंपर्क करत सर्वसामान्य माणसाची जोडलेली नाळ आदर्श सुसंस्कृत परिवार म्हणून आणि उच्चशिक्षित उमेदवार म्हणून ॲड राजमालाताई बुट्टे पाटील पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटामध्ये सहज विजयश्री खेचून आणू शकतात का? हे पुढील काळच ठरवेल. त्या गटात इच्छुक असणारे अनेक उमेदवारांचे व ॲड राजमालाताई बुट्टे त्यांच्यात खरी चुरस होणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या जिल्हा परिषद गटात लागले आहे.तसेच आंबेठाण पंचायत समिती गणातून गेली 25 वर्ष दांडगा जनसंपर्क असलेले खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ भामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ राजगुरुनगर वकील संघटना या सर्व ठिकाणी कार्यरत असलेले आसखेड खुर्द गावचे मा सरपंच चेअरमन ॲड बाळासाहेब महादेव लिंभोरे पाटील यांच्या सौ योगिता बाळासाहेब लिंभोरे पाटील प्रथम महिला सरपंच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पाईट आंबेठाण गट महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांनी मतदारसंघांमध्ये प्रचार फेरी पूर्ण करून प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतली आहे आणि अत्यंत आत्मविश्वासाने त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये पाईट आंबेठाण जिल्हा परिषद पंचायत समिती गट व गणांमध्ये निश्चितपणाने चुरशीच्या लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील ॲड राजमालाताई बुट्टे पाटील यांचा व त्यांच्या परिवाराचा या जिल्हा परिषद गटातील महिला व पालक वर्ग यांच्याशी चांगला संपर्क असल्याने ही निवडणूक मीच जिंकणार असल्याचे सांगितले.
Share this content:
