

प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहकलचे उपक्रमशील मुख्याध्यापक संजय नाईकरे यांच्या फेसबुक वॉल वरून प्रसारित झालेल्या अनेक शैक्षणिक व सामाजिक पोस्ट पाहून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची भावना मुंबई येथील एका नेटकरी सोशल मीडिया वापरणाऱ्या अधिकाऱ्याच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी फेसबुक वॉल वरून फोन नंबर शोधून काढून आपली भावना संजय नाईकरे यांच्याकडे व्यक्त केली. संजय नाईकरे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक पोस्ट पाहून अनेक नेटकरी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
गेल्या ऑक्टोबर महिन्यातील त्यांच्या एका पोस्टला आज अखेर तब्बल आठ लाख सहा हजार तीनशे पंचावन्न व्हुज मिळाले आहेत.त्यांच्या पोस्ट पाहणा-यांपैकी पैकी त्यांच्या एका फेसबुक मित्राने त्यांना आवर्जून फोन करून उत्स्फूर्तपणे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना काही तरी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.मात्र ही मदत आपल्या नावाचा उल्लेख न करता गरजू विद्यार्थ्यांसाठी सुपूर्द करावी अशी त्यांनी अट घातली.ही अट मान्य करुन मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी या उपक्रमासाठी थिगळस्थळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थिनीची निवड केली पितृछत्र हरपलेल्या व सध्या इयत्ता सातवीत शिकत असलेल्या विद्यार्थीचे इयत्ता पहिलीत असतानाच पितृछत्र हरपलेले आहे.वडिलांच्या मायेला आणि सहवासाचा पोरकी झालेल्या या मुलीला सांभाळण्यासाठी आईने सुद्धा असमर्थता दर्शवली.त्यामुळे ती अवघी सात महिन्यांची असल्यापासून या मुलीचा तिच्या मामाने सांभाळ केला आहे.राजगुरुनगर मध्ये आपले छोटेसे सलूनचे दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह भागवितात.अशीच धावपळ करीत त्यांनी आजवर या मुलीचा मायेने सांभाळ केला आहे.
योगायोगाने मागील आठवड्यात या मुलीबद्दल सविस्तर माहिती मिळाल्यानंतर तिला काही तरी शैक्षणिक मदत करण्याची इच्छा श्री संजय नाईकरे यांनी व्यक्त केली होती.आणि जणू काही त्यांचा मनोदय अज्ञात शक्तीने जाणून घेऊन आजवर अनोळखी असलेल्या व्यक्तीने आज या विद्यार्थीनीला भरघोस मदत पाठवून दिली. त्यातून या विद्यार्थीनी साठी स्वेटर कपडे घड्याळ सॅंडल व शालोपयोगी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
राजगुरुनगर येथे कोणताही गाजावाजा न करता रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष नरेश हेडा, थिगळस्थळ शाळेतील शिक्षक प्रतिनिधी संजय घुमटकर, खेड तालुका वन्यजीव संरक्षण संस्थेचे संचालक चेतन गावडे, महादेव दरा कडधे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली नाईकरे व महेश दळवी (मामा)
यांच्या उपस्थितीत ही सर्व मदत संबंधित विद्यार्थीनी ला सुपूर्द करण्यात आली.यावेळी या मुलीने आपल्याला मदत केलेल्या अज्ञात देवमाणसाचे आभार मानले.तिच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनिता गावडे यांनी शुभेच्छा दिल्या.
Share this content:
