
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
भारतीय जनता युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष श्री. जयदीप करपे यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाप्रती आपली नैतिक जबाबदारी ओळखून वाढदिवस अनाथ मुलांन बरोबर साजरा केला.
वाढदिवस म्हटले की सेलिब्रेशन आले. मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करण्यास तरुणाई उत्सुक असते. मात्र, या सर्व गोष्टी नकरता सामाजिक जाणिवांचे भान ठेवत अनाथाश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा करून तरुणाई समोर आदर्श ठेवला आहे. मातृछाया बालकाश्रम दिघी येथे आपल्या भाजपा युवा मोर्चाचे सहकारी व मित्र परिवार केक कापून अनाथांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले.
शहरातील काही तरुण-तरुणींनी एकत्र येऊन आपला वाढदिवस अनाथांना आपलेसे करूनच साजरा करायचा असा संकल्प केला आहे. भेटवस्तू स्वीकारण्याऐवजी भेटवस्तू आणि अल्पोपाहार देऊन वाढदिवस साजरा करणारी ही तरुणाई सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करणार. युवा मोर्चाचे पदाधिकारी यांनी वाढदिवसाला होणारा खर्च आश्रमातील मुलांसाठी करण्याचा संकल्प केला. त्यांच्यासोबतच केक कापला अन जल्लोषाच्या वातावरणात सर्वांनी तालही धरला. गप्पा आणि पुन्हा परत येण्याचे वचन अनाथाश्रमातील मुलांना देण्यात आले.
बालिकाश्रमातील हा सोहळा आनंद देणारा ठरला. बालिकाश्रमातील मुलांशी संवाद साधला. आम्ही यापुढेही येथे येऊ तुम्हाला शक्य ती मदत देऊ, असे सर्वांनी सांगितले.अना़थ मुलांसोबत वाढदिवस साजरा करणे हा एक अत्यंत भावनिक आणि सामाजिक उपक्रम आहे. यात अनाथाश्रमात केक कापणे, मुलांना फळे व खाऊ देऊन आनंद द्विगुणित करता येतो. मुलांसोबत खेळ, गाणी आणि गप्पागोष्टी करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हा या सोहळ्याचा खरा उद्देश होता.असे श्री.जयदीप करपे यांनी सांगितले.
यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री.दिनेश यादव, नगरसेवक श्री.उदय गायकवाड, महापौर रवी लांडगे यांचे बंधू प्रकाश लांडगे व उद्योजक प्रशांत आहेर,अजिंक्य आहेर, यश करपे, शौर्य करपे व जयदीप करपे मित्र परिवार उपस्थित होते.
Share this content:
