

प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या अनाथ, बेघर व निराधारांना मी आणि माझी यशोदा सामाजिक संस्था मायेची सावली देईन, असा निर्धार सामाजिक कार्यकर्त्या रूपालीताई राक्षे यांनी केला.
खेड तालुक्यातील जरेवाडी येथे अनाथांसाठी यशोदा या सामाजिक संस्थेचा खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना रूपालीताई बोलत होत्या. याप्रसंगी आ. बाबाजी काळे, पोलीस पाटील रुपाली रोडे, अर्चना किर्लोस्कर, वैशाली जरे, वैशाली कांबळे, सुरेखा रावळ, सुशिला मोरे, एड. सुलभा कोटबागी, सरपंच अशोक जरे, उपसरपंच मयूर जगदाळे, अंकुश जरे, संतोष ढोरे, कैलास दुधाळे, अनिल राक्षे, नितीन सैद, आदी मान्यवर उपस्थित होते.
रूपालीताई राक्षे पुढे म्हणाल्या,” जाणता राजा छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. तोच समतेचा विचार पुढे महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राणपणाने जपला आणि वाढवला. या थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी आणि माझी यशोदा सामाजिक संस्था अनाथांसाठी सावली बनून चिरंतन काळ समाजात काम करणार आहे.”
जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या दिप्तीताई भोगाडे यांनी कर्तुत्वान असलेल्या रुपालीताई राक्षे यांच्या उत्तुंग कार्याचा गौरव केला. रूपालीताई यांनी प्रचंड मेहनत घेऊन अनाथ, वृद्ध व गरिबांसाठी यशोदा या सामाजिक संस्थेची स्थापन केली. त्यांचा आदर्श आजच्या पिढीला चालना व प्रेरणा देणारा एक चालता बोलता इतिहास आहे.”
” यशोदा या सामाजिक संस्थेचा आणि रूपालीताई राक्षे यांच्या मदतीचा गरजू व निराधारांना निश्चित फायदा होणार आहे. संस्थेसाठी लागणारे सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध राहू.” – बाबाजी काळे, आमदार, खेड,.रूपालीताई राक्षे व जरेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Share this content:
