प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेते पदी खेड तालुक्यातील तडफदार नेतृत्व Adv. विजयसिंह (विजयदादा) बाबासाहेब शिंदे पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (कलेक्टर ऑफिस) येथे संपन्न झालेल्या या विशेष निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विजयदादांचे वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख मा. सचिनभाऊ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खेड-आळंदी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. बाबाजी शेठ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापती म्हणून त्यांनी केलेले प्रभावी काम आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव विचारात घेऊन, सर्व सदस्यांनी त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.
अभ्यासू नेतृत्व, आक्रमक शैली आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड ही विजयदादांची ओळख जिल्हा परिषदेत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या निवड प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गणेशनाना अरगडे, गुलाब पारखी, दीप्तीताई भोगाडे, तनुजाताई घनवट, विनायताई मुंगसे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन विजयदादांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Share this content:
