
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
रुम टू रीड या संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2023 रोजी सुरू करण्यात आलेले बालस्नेही वाचनालय याचा हस्तांतरण कार्यक्रम जि. प. प्राथ. शाळा निमगाव येथील शाळेत पार पडला. यासाठी गावचे उपसरपंच संतोष शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य,SMC अध्यक्ष डॉ.दीपक शिंदे व सर्व सदस्य, बाळासाहेब शिंदे पाटील,डी.के.शिंदे सर,सोपान शिंदे,सुरेश भगत,पत्रकार मनोहर गोरगल्ले,शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पवार, पदवीधर शिक्षक संजय सुपे, बाळासाहेब पोकळे,सुजाता कातोरे,अर्चना थिगळे आणि विद्यार्थी तसेच अंगणवाडी सेविका कमल गावडे, मदतनीस पूजा भालेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रुम टू रीड च्या वतीने समन्वयक श्री मंगेश तळेकर यांनी उपस्थितांना उपक्रमाबद्दल माहिती दिली. यामध्ये संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षांमध्ये शाळेकडून देण्यात आलेल्या खोलीची रंगरंगोटी, पुस्तके ठेवण्यासाठी 3 कपाटे, 4 वाचन टेबल, 2 टाचणी फलक, 4 ज्यूट बॅग्स, विद्यार्थ्यांना वाचनालयात बसण्यासाठी 2 सतरंज्या, विद्यार्थ्यांना वैयक्तिक कार्यपुस्तिका, शैक्षणिक साहित्य, पॅरेंट कॅलेंडर आणि 1546 इतकी पुस्तके वाचनालयासाठी देण्यात आली. या तीन वर्षात वाचनालया संदर्भात झालेल्या उपक्रम आणि कार्यक्रमांसंदर्भात माहिती देण्यात आली.
यावेळी वाचनालय निरंतर सुरू राहावे, वाचन उपक्रम, पुस्तक देवान घेवाण या प्रक्रिया नियमित सुरू राहाव्यात यावर चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येकाने जबाबदारी घेऊन वाचनालयात येत्या काळात पुस्तकांची वाढ करावी. यामध्ये ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांची प्रमुख भूमिका असेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पोकळे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय सुपे सर यांनी मानले.
Share this content:
