


प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत आज दिनांक- 14/03/2026 रोजी खेड तालुक्यातील कडुस मंडळ भागामध्ये रिद्धी सिद्धी गार्डन मंगल कार्यालय चांडोली या ठिकाणी प्रांत अधिकारी अनिल दौंडे व तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते. महसूल विभागाच्या तसेच इतर शासकीय विभागांच्या प्रमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अनुषंगाने शासन आपल्या दारी हा संकल्प ठेवून चांडोली येथे वेगवेगळे विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. शिबीराच्या माध्यमातून खालील प्रमाणे शासकीय योजनांचा लाभ कडुस मंडळाच्या पंचक्रोशीतील नागरिकांना देण्यात आला.
ई फेरफार प्रणाली अंतर्गत एकूण 151 फेरफार निर्गत करण्यात आले. व सर्व प्रलंबित फेरफार निर्गत करून खालील प्रमाणे 7/12 व 8 अ वितरीत करण्यात आले.
8अ उतारे -87 , 7/12 -256 तसेच कलम 155 अंतर्गत एकूण 34 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 17 अर्जावर त्यावर तात्काळ कारवाई करून आदेश देणेत आले. रेशन कार्ड 10 कुटुंबांना वाटप करण्यात आले तर 17 अर्ज प्राप्त झाले आहेत. पीएम किसान अंतर्गत 55 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे -14 लाभार्थी यांना लाभ मंजूर करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले-15 डोमासाईल सर्टिफिकेट-358 उत्पन्नाचे दाखले-157 असे एकूण 530 दाखले मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. तसेच एक तक्रार केस शिबिरामध्ये तडजोड झालेने केस निर्गत करून त्यांना 7/12 उतारा व फेरफार वितरित करण्यात आला.
सदरचे शिबिर हे माननीय आमदार बाबाजीशेठ काळे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते वरील विविध योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले तसेच या शिबिरास कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा जिप सदस्य विजय शिंदे जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट व जि प सदस्य गणेश नाना अरगडे, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील,पंचायत समिती सभापती विद्याताई मोहिते उपसभापती मंगेश सावंत,सरपंच चांडोली प्रिया पवार, निवासी नायब तहसिलदार चेतन मोरे, महसूल नायब तहसिलदार राम बिजे,कडुस मंडळाचे मंडळ अधिकारी विद्या नांगरे तसेच विविध विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. कडुस मंडळअधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.
यावेळी शासनाच्या विविध योजनाची सविस्तर माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी उपस्थित नागरिकांना दिली.तर मा. आमदार बाबाजीशेठ काळे यांनी विविध योजना चा लाभ नागरिकांना होत असलेबाबत समाधान व्यक्त करून अन्य महसूली मंडळातील नागरिकांना शिबाराचे माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना देणेसाठी प्रशासनाचे विविध विभागांनी समर्पित भावनेने काम करावे असे आवाहन केले.तसेच लाभार्थ्यांनी महाराजस्व अभियानअंतर्गत शासनाच्या योजनाचा लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
Share this content:
