प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील शिरोली गावातील खेड तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप आप्पा दजगुडे यांनी आपला जन्मदिवस शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून साजरा केला. सर्व मान्यवरांच्या हस्ते केक कापून सामूहिक शुभेच्छा देण्यात आल्या. सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी हरीशभाई देखणे रिपब्लिकन नेते ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश भाऊ सावंत, शिरोली ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच संजय सावंत, ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ वाळुंज, शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संस्थापक मा. चेअरमन तुकाराम सावंत, सामाजिक कार्यकर्ते सद्गुरु दजगुडे तसेच आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापक मधुकर दौंडकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी जन्म दिवसानिमित्त सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन सुधीर दजगुडे यांनी केले.
Share this content:
