“महिला दिनानिमित्ताने राजगुरूनगरमध्ये विविध उपक्रमांचेआयोजन”
राजगुरूनगर-येथील खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे वतीने आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला दिनाचे औचित्य साधून संघाने आदर्श माता पुरस्कार, पायी नर्मदा परिक्रमा केलेल्या महिलांचा सत्कार व हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रथम वनिता महिला भज
नी मंडळ, राजगुरूनगर यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. श्री समर्थ फार्माच्या प्रोप्रा.शितल घुमटकर यांनी महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन केले.त्यानंतर पै. शिवराज राक्षे (दोन वेळचा “महाराष्ट्र केसरी पदक विजेता) यांच्या मातोश्री सौ. सुरेखाताई काळूराम राक्षे यांना “आदर्श माता”पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सुमारे ३६०० कि. मी.पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल ह. भ. प. सौ. लक्ष्मीबाई मधुकर गवते यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपले अनुभव कथन केले. उपस्थित सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. कमल गाढवे यांनी अध्यक्षपद भूषविले.
यावेळी लता खेडकर, निर्मला गवते, उज्वला भालेकर, अंजना ढोरे, द्रौपदी घुमटकर, शैलजा बोंबले,कमल शिरसाट, कमल कळमकर, विमल लुणावत,मंगल कुलकर्णी, प्रमिला निकम, छाया कळसकर, सुनंदा जाधव, शारदा कराडकर,शैला कुलकर्णी, शुभांगी गुजराथी, जयमाला आवटे, भाग्यश्री थेटे, स्वप्नाली गवते, ज्योती लुणावत,शारदा दोंदेकर, सुखदा धांदरफळे,मालन पाचकर, मुक्ता माळशिरसकर, आशा घुमटकर तसेच खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर खेडकर, पदाधिकारी शंकर गाढवे, बाळासाहेब गवते,अनंत भालेकर, एकनाथ वाळुंज, लक्ष्मण जोशी, प्रभाकर माळी, गुलाब पखाले,राजन जांभळे,जि. रं. शिंदे, सोपान घुमटकर, रवींद्र काळे, अशोक घुमटकर,सतीश चांभारे, प्रा. बोरसे, सार्थक घुमटकर, मच्छिन्द्र भालेकर, गजानन पाठक व कान्हू अरगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उर्मिला जोशी यांनी केले.कावेरी कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ वाळुंज यांनी आभार मानले.
Share this content:
