प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्या कार्यावर आधारित लेखक अशोकराव टाव्हरे लिखित विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट (इंग्रजी) या पुस्तकांचे वितरण नागपुरमध्ये करण्यात येत आहे. कनेरसर.ता.खेड येथील अशोकराव टाव्हरे यांनी गडकरींचा जीवनपट या पुस्तकांतून उलगडला आहे.विधानपरिषद सदस्य,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,विरोधी पक्षनेते,भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष,केंद्रीय मंत्री म्हणून रस्ते व पायाभुत सुविधांबाबत देशभरातील अतुलनीय कामगिरी याद्वारे वाचकांपुढे आणली आहे.लेखक अशोकराव टाव्हरे यांनी केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची नागपुर येथे भेट घेऊन सदर पुस्तके नागरिकांना वितरित करण्याची संकल्पना मांडली.गडकरींनी याबाबत टाव्हरेंचे आभार मानले.टाव्हरे ,दिलीपराव माशेरे,सुनील मोरडे यांनी गडकरींच्या लोकसंवाद यात्रेत सहभागी होऊन नागरिकांना पुस्तके वितरित केली.गडकरींना यावेळी ज्ञानेश्वरीची प्रत भेट देण्यात आली.

नागपुर लोकसभा निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला असून पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला नागपुरची निवडणुक होत असल्याने प्रचारासाठी आठवड्याचा अवधी राहिला आहे.महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्यात सरळ लढत होत असून देशाचे नागपुरच्या निकालाकडे आहे.मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवे,देशभरात राष्ट्रीय महामार्ग व एक्सप्रेस हायवेंच्या माध्यमातून साधलेला पायाभुत सुविधांचा विकास यामुळे नितीन गडकरी यांची देशभरात असलेली उज्वल प्रतिमा,प्रभावी राष्ट्रीय नेते असल्याने त्यांचे कार्य जनतेपुढे जाण्यासाठी पुस्तक वितरण करीत असल्याचे लेखक अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.
Share this content:
