प्रतिनिधी- विजय धादवड
पिंपळगाव घोडे, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील महात्मा फुले उत्सव समिती यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती जिल्हा महिला बालविकास आयुक्त महाराष्ट्र राज्य संचलित सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या अनाथ आश्रमामध्ये विद्यार्थांना नित्यउपयोगी साहित्य व गोड जेवण देऊन साजरी करण्यात आली. महात्मा फुले उत्सव समिती अध्यक्ष श्री. अतुल भास्कर यांनी यापुढेही समितीच्या वतीने अशीच मदत करण्याचे आश्वासन दिले. मंडळाचे सदस्य तसेच पिंपळगाव घोडे चे विद्यमान उपसरपंच श्री. लक्ष्मण वागदरे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना आश्रमातील मुलांचे कौतुक केले. व स्वतः व समितीच्या माध्यमातून या आश्रमासाठी मदत करण्याचे जाहीर केले. या प्रसंगी महात्मा फुले उत्सव समिती चे सदस्य विजय धादवड, प्रफुल्ल लाडके, चंद्रसेन वाकचौरे, सागर जोशी, शुभम भास्कर, किरण पोखरकर, मंगेश पोटे, अवधूत बांगर, सचिन वागदरे विशाल गाडेकर, आदित्य भास्कर , कुसुम आत्या शिंदे व समितीच्या सचिव सौ. ज्योती भास्कर उपस्थित होते.

Share this content:
