पुणे ,बारामती पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मोक्काच्या आरोपाखाली कारागृहात बंदिस्त आरोपीला पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने तब्बल तीन वर्षा नंतर जामीन मंजूर केला आहे. अमीन दिलावर इनामदार असे जामीन मंजूर झालेल्या ओरोपिचे नाव आहे त्या बाबत सविस्तर माहिती अशी कि,

दि.०७/०२/२०२१ रोजी आरोपी अमीन व त्याचे इतर ५ ते ७ मित्र फिर्यादी याचे स्नेहा गार्डन हॉटेल या ठिकाणी गेले होते तेंव्हा आरोपी ने हॉटेल मालकास त्यास होत्येल चालवायचे असेल तर दरमहा २५ हजार रुपये महिना खंडणी म्हणून द्यावी लागेल अशी मागणी केली होती, तेंव्हा फिर्यादी यांनी आरोपीस त्याची ऐपत नसून थोडे फार पैसे देत जाईल असे सांगितले होते परंतु आरोपींनी आम्ही इथले भाई आहोत असे सांगून फिर्यादी च्या हॉटेल मधील दारू च्या बाटल्या काढून घेतल्या व त्या पिऊन झाल्यावर फिर्यादीस मारहाण केली होती, त्यानंतर फिर्यादी च्या तक्रारी वरून बारामती पोलिसात आरोपी व त्याचे मित्रांचे विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यानंत पोलिसांनी तपासादरम्यान मोक्का कायद्याचे कलम लावण्यात आले होते. आरोपी येरवडा कारागृहात असताना आरोपी अमीन यांनी अॅड. विपुल दुशिंग, अॅड.नितीन भालेराव यांच्या द्वारे पुणे येथील विशेष न्यायलयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता.आरोपी याने कुठलाही गुन्हा केलेला नसून आरोपी व फिर्यादी यांच्यात व्यवहारावरून वाद झाले होते आणि त्या मुले आरोपी यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते तसेच आरोपी याचे विरुद्ध पोलिसांना तपासादरम्यान कुठलाही पुरावा हस्तगत करता अल्ला नसल्याने आरोपीस जामिनावर सोडण्यात यावे असा युक्तिवाद आरोपी पक्षा तर्फे करण्यात आला होता. आरोपी पक्ष व सरकार पक्षांचा युक्तीवाद ऐकून पुणे येथील विशेष न्यायधीश व्ही.आर.कचरे साहेबांच्या कोर्टाने आरोपीस जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती आरोपीचे वकील अॅड.नितीन भालेराव यांनी दिली या कामी अॅड.सुरज शिंदे यांनी मदत केली.
Share this content:
