खरपुडी बु
प्रतिनिधी – दत्ता भगत सर
खेड तालुक्यातील आदर्श खरपुडी गावांमधील आंबेहोळ येथे गुरुदेव दत्त मूर्तीचा सातवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये ह.भ.प. संजय महाराज हिवराळे यांचे कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली . त्यांनी भगवंत जर तुमच्या पाठीशी असेल तर कशाची भीती नाही तसेच रोगी माणूस जिवंत असून मेल्यासारखाच असतो. नामस्मरण हीच खरी भक्ती अशा विविध विषयावरती सुश्राव्य अशी कीर्तन रुपी सेवा केली आहे. त्यांनी लेक वाचवा, हुंडाबंदी, बालविवाह अशा वेगवेगळ्या विषयांवर ती समाज प्रबोधन केले आहे. पंचायत समितीचे मा. सभापती सतीश राक्षे, सरपंच गणेश काळे, खरपुडी गावचे आदर्श सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे, चौधरी पाटील इंग्लिश मीडियम चे संस्थापक अध्यक्ष कैलास चौधरी यांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. किर्तनकार सौजन्य ज्ञानेश्वर चौधरी पुढारी यांनी केले. ह.भ.प.श्री सोमनाथ साठे सुप्रसिद्ध गायक मुळशी रत्न, ह.भ.प.चौरंगीनाथ महाराज आढाव मृदुंगवादक मुळशी भुषण,श्री.अशोक ओव्हाळ विद्यमान सरपंच चांदे मुळशी ही सर्व मंडळी निमंत्रित केले होती,यावेळी किर्तनाला साथ ह.भ.प.वसंत महाराज पवळे , ह.भ.प.विष्णू महाराज काटकर , ह.भ.प.मधुकर महाराज शिंदे ,ह.भ.प.दत्तात्रेय महाराज बरबटे , ह.भ.प.निवृत्ती महाराज थोरात. ह.भ.प.काळूराम महाराज काळे यांनी दिली. तर आळंदी येथील वारकरी संस्थेच्या मुलांनी टाळ वाजवण्याचे काम केले. गावामध्ये विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक केलेल्या विद्यार्थ्यांचे मान सन्मान करण्यात आले.या समयी खरपुडी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन घाटे सर यांनी केले. किर्तन सेवा संपल्यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घेतला.हा सोहळा संपन्न होण्यासाठी
मा सरपंच विलास चौधरी आणि आंबेओहल सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.आंबेओहळ वस्तीने केलेल्या या कार्यक्रम सोहळ्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
Share this content:
