पुणे
दि.२६/०४/२०२४
मुंढव्यातील ओरिला हॉटेल च्या २ कामगाराना धारदार शस्त्राने मारहाण करणाऱ्या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आबीद युसूफ खान असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.या बद्दल सविस्तर माहिती अशी की, दि.२७/०५/२०२३ रोजी ओरिला हॉटेल चे २ कामगार काम संपवून मध्यरात्री २:०० वाजता घरी निघाले असता रस्त्यात ३ आरोपीनी त्यांना अडवून आम्हाला हॉटेल आम्हाला का एंट्री दिली नाही आणि का हसत होते म्हणून त्यांच्या कडे आणलेल्या धारदार शास्त्रांनी डोक्यात हातावर खांद्यावर सपासप वार केले होते त्या वेळी फिर्यादी आरोपीना अडवायला गेला असता त्यास सुद्धा मारहाण करून वार करण्यात आले होते. त्या नंतर फिर्यादी च्या तक्रारीवरून ३ अनोळखी लोकांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि ईतर कायद्यान्वये मुंढवा पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मुंढवा पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून आरोपीस अटक करण्यात आली होती त्या नंतर आरोपीची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात झाली होती. आरोपी कारागृहात असताना आरोपीने ॲड.अमित ईचंम व ॲड.नितीन भालेराव यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता. सदर गुन्हा हा अनोळखी लोकांनी केला आहे अशी फिर्याद असताना आरोपीस केवळ संशयावरून अटक केली आहे तसेच आरोपीची ओळख परेड घेण्यात आलेली नाही त्या मुळे याच आरोपीने केला आहे असे म्हणता येणार नाही असा युक्तीवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला. आरोपीपक्ष व सरकारपक्षाचा युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.माधव जामदार यांच्या खंडपीठाने आरोपीस अटी व शर्तींवर जामीनावर सोडण्याचे आदेश पारीत केले आहेत. अशी माहिती आरोपींचे वकील ॲड.नितीन भालेराव यांनी दिली.
Share this content:
