प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले खेड तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील मुक्या प्राण्यांसाठी तसेच पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व अन्नधाण्याची सोय करण्यात यावी यासाठी अमर मच्छिंद्र बोर्हाडे भाजपा नेते, विशेष कार्यकारी अधिकारी तसेच समाजसेवक खेड तालुका राष्ट्रीय मान्यव अधिकार सेवा ट्रस्ट प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, प्राथमिक आरोग्य कमिटी सदस्य वाफगाव यांनी आज वनक्षेत्रपाल अधिकारी प्रदिप रौंधळ साहेब यांना निवेदन दिले.यावेळी अमर बोर्हाडे त्यांनी सांगितले की खेड तालुक्यातील मुक्या प्राण्यांसाठी, उपाशी पक्षासाठी पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किंवा खाण्यासाठी चारा व धान्य मिळत नाही खेड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यामुळे पाणी व अन्नधान्यां पासून पशुपक्ष्यांचे हाल होत आहे. त्यासाठी वन खात्याने कृतीम पाणवठे तयार करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच वन हद्दीत जे खड्डे खोदलेले आहेत त्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था करावी व पशुपक्ष्यांसाठी अन्नधान्याची व्यवस्था करावी त्यामुळे तेथील पशु पक्षांची व प्राण्यांची सोय होईल व भविष्यात प्राण्यांची व पशुपक्षांची जिवित हाणी होणार नाही.

Share this content:
