प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
दलित पँथर या संघटनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पा.यांना पाठींबा देण्यात आला.कडुस येथील सभेत दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे,भाजपचे नेते अशोकराव टाव्हरे,दलित पँथरचे युवा प्रदेशाध्यक्ष शुभम सोनवणे यांनी आढळराव यांना पत्र दिले.यावेळी आमदार दिलीपराव मोहीते,आमदार अमोल मिटकरी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी नामदेवराव ढसाळ यांनी स्थापन केलेली दलित पँथर ही संघटना महायुतीच्या पाठीशी असल्याचे विशद केले.अशोकराव टाव्हरे यांनी कळमोडी पाणलोट विकास संस्था व शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड या संस्थाच्या पाठींब्याचे पत्र आढळराव पा.यांना दिले.
Share this content:
