प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रीफिल हेल्थ प्रो. प्रायव्हेट लिमिटेड ही सामाजिक संस्था आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र गेले 2015 पासून देशभर व्यसनमुक्ती मधुमेह मुक्ती रोगमुक्ती शिशु रक्षा व वेदना मुक्ती अशा महत्त्वाच्या व घरोघरी अत्यंत गरज असणाऱ्या विषयावर कार्य करत आहे संस्थेचे हे अभियान घरोघरी पोहोचवण्यासाठी संस्थेकडे प्रशिक्षित हजारो PRO ,डॉक्टर, सोशल वर्कर, शिक्षक, विद्यार्थी ,रिटायर्ड पर्सनल व गृहिणी आहेत त्यांच्या माध्यमातून लाखो लोकांना फायदा होत आहे आपल्या संपर्कातील लोकांना त्यांच्या व्याधीतून बाहेर काढण्यासाठी योग्य उपचार पथ्य तसेच व्यायाम संदर्भात योग्य मार्गदर्शन करणे हे काम अहो रात्र ही सर्व मंडळी लोकांपर्यंत पोहचवीण्याचे कार्य करत आहे.त्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली आहे. याची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या PRO ना या संस्थेकडून राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार देऊन सन्मानित केला जाणार आहे. यावर्षीही हजारो PRO मधून निवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या PRO श्री संदीप बाळकृष्ण गाडे पाटील राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. श्री संदीप बाळकृष्ण गाडे पाटील यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असुन त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्र परिवारांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांच्या मित्र परिवारांनी सांगितले.
Share this content:
