प्रतिनिधी – उत्तमराव खेसे सर खेड : ता .२६ जुन रोजी . महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर येथे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती कार्यशाळा झाली संपन्न .पंचायत समिती खेड व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विषय अध्यापक संघ यांच्या सहकार्याने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली . रंगनाथ सुंबे संगमनेर यांनी मराठी भाषा व्याकरण येणारे प्रश्न यांचे मार्गदर्शन केले . कल्याण कडेकर शिरूर यांनी गणित विज्ञान विषयाची तासिका नियोजन दोन पर्याय निवडा यांची तयारी करून घेतली . अविनाश परांडे सर शिरूर पॅटर्न यांनी डिजिटल ज्ञानाने स्कॉलरशिप सर्व विषयाचे मार्गदर्शन केले .आहेर/ गावडे मॅडम यांनी इंग्रजी व्याकरण येणारे प्रश्नांचे मार्गदर्शन केले .आभार कार्यक्रमात वि . अधिकारी पं .स. खेड जीवन कोकणे साहेब यांनी शिष्यवृत्ती इ .८वी . साठी मेरीटमध्ये विद्यार्थी लावणे यासाठी मोठी संधी आहे . शिक्षकांनी संधीच सोन कराव विद्यार्थी गुणवत्ता, पालकांची इच्छा यांना न्याय दयावा . विद्यार्थी शिष्यवृत्तीत उतरला पाहीजे मेरीटमध्ये आला पाहीजे, चांगली मार्क्स मिळवून उतीर्ण झाला पाहीजे . त्यासाठी पालक आपल्या मुलाला चांगल्या शाळेत पाठवितात त्यामुळे आपल्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी होते . जीवन कोकणे साहेब यांनी मार्गदर्शन केले .विस्तार अधिकारी जीवन कोकणे साहेब यांचा सन्मान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जनलोक वार्ता उत्तमराव खेसे सर यांच्या हस्ते करण्यात आला . शिष्यवृत्ती समन्वयक विलास आदलिंगे सर , समन्वयक पं .स. खेड देविदास शिंदे यांनी शिष्यवृत्ती कार्यशाळेसाठी अनमोल सहकार्य केले . या कार्यशाळेतून १००ते १२५ शिष्यवृती शिकविणारे अध्यापकांनी ज्ञान घेतले . याचा निश्चित फायदा विद्यार्थी यांना होणार आहे .

Share this content:
