प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले वाफगाव ता.खेड येथील संत रोहीदास नगर येथे मा. राज्यसभा खासदार अमर साबळे साहेब यांच्या माध्यमातून सांस्कृतिक सभामंडपास निधी मंजूर करण्यात आला होता.स्थानिक शेञवीकास कार्यक्रमांतर्गत नुकतेच सभामंडपाचे काम पुर्ण झाले आहे .या सभामंडपासाठी खेड तालुक्याचे समाजसेवक भाजपा नेते वीषेश कार्यकारी अधीकारी यांनी पाठपुरावा केला. सभामंडपाची रंगरंगोटी करण्यात आली असुन, परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे ,सभामंडपासमोर हायमास्ट दीवा लावण्यात आला आहे .परीसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे हा सांस्कृतिक सभामंडप झाल्याने या ठीकाणी विविध सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, समाजोपयोगी ,सामाजिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांना हक्काची जागा मीळाली आहे.त्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share this content:
