
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
राजगुरूनगर : खेडमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यावरून राजकारण चांगलय रंगताना दिसत आहे. विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दमदाटी करत, दहीहंडीच्या कार्यक्रमाचे बॅनर उतरवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुधीर मुंगसे यांनी केलाय.
येत्या २७ तारखेला सुधीर मुंगसे यांनी खेडच्या बाजारसमिती आवारात दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी मुंगसे यांनी खेड टोल नाक्यावर मोठा बॅनर लावला होता. मात्र, विद्यमान आमदार दिलीप मोहिते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करत त्यांच्या कार्यक्रमाला बॅनर उतरवत त्याच ठिकाणी स्वतःच्या कार्यक्रमाचा बॅनर लावला.
यावर सुधीर मुंगसे यांनी, आमदार मोहिते पाटलांना बालिश राजकारण न करता वैचारिक लढाई करा असा सल्ला दिलाय.

Share this content:
