
प्रतिनिधी – डॉक्टर देवेंद्र ओव्हाळ खेड पुणे
चिखलगाव ग्रामपंचायत व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलगाव सुरकुंडी या नवीन झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी शालेय विद्यार्थी व ग्रामपंचायतचे वतीने 500 वृक्षांची लागवड करण्यात आली या लागवडीसाठी ग्रामपंचायतची कलगावणे निधी उपलब्ध करून दिला आहे त्यासाठी सन्माननीय कर्ज भीमाशंकर जोड मार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष किसनराव गोपाळे चिखलगाव च्या सरपंच सन्माननीय शोभाताई बाळासाहेब गोपाळे व शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय देशमुख सर बोरदे सर डहाळे सर भागवत सर मध्ये सर या सर्व शासकीय आश्रम शाळेच्या शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गाने विशेष सहकार्य केले व रस्त्याच्या बाजूला लावलेल्या संपूर्ण झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतले इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवण्याची संकल्पना आश्रम शाळा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहेसदर वृक्ष लागवडीसाठी चिखलगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सन्माननीय एमडी देवाडी भाऊसाहेब व चिखलगाव चे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे व ग्रामस्थांनी विशेष प्रकारे सहकारी केले

Share this content:
