प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
बदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे तसेच मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा शुक्रवार, दि. 23-08-2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, राजगुरुनगर येथे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष हरेशभाई देखणे यांच्या नेतृत्वामध्ये जनआक्रोश निदर्शने करण्यात आली.

“महिलांवरील अन्याय अत्याचार थांबलेच पाहिजे”!, “चिमुकलीला न्याय द्या”! “अक्षय शिंदे याला फाशी झालीच पाहिजे”,”मुख्यमंत्री राजीनामा द्या” !”गृहमंत्री राजीनामा द्या”! “पोलीस प्रशासन जागे व्हा”! अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. महिला व तरुणींनी यांच्या भाषणांमधून यावेळी आक्रोश व्यक्त केला.या आंदोलन मध्ये महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच आंदोलनाला SFI विद्यार्थी संघटना,राजेजी गुजर संघटनेने सुद्धा सहभाग घेतला होता.हरेशभाई देखणे, रज्जाकभाई शेख,अलका जोगदंड, तुषार गायकवाड, निशा शिंदे,स्वप्निल गायकवाड़ तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले..
यावेळी हरेशभाई देखणे, रज्जाकभाई शेख , संदीपभाऊ साळुंखे, जाकीरभाई शेख, कैलास केदारी ,अलका गुंजाळ ,अलका जोगदंड, तुषार गायकवाड, निशा शिंदे,हेमंत विरकर, स्वप्निल गायकवाड ,सत्यवान शिंदे, सचिन देखणे, सागर शिंदे, हरीश कांबळे इ. उपस्थित होते.
Share this content:
