
प्रतिनिधी – संतोष गाडेकर
बीड;- लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. शेतकरी अभियान सर्व योजना राबवून सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परळी येथे वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन केले व पिक पाहण्याची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री केली.परळी येथील स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पाच दिवसाच्या कृषी महोत्सव सोहळा २०२४ उद्घाटन झाले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान, प्रमुख उपस्थिती मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , राज्याचे कृषिमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल विधान परिषद सदस्य आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन झाले कृषी उत्पन्न बाजार समिती
येथे कार्यक्रम संपन्न झाला
Share this content:
