सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
आळेफाटा (ता .जुन्नर ) हद्दीतील सन २०२३-२४ दरम्यान गहाळ झालेल्या व तक्रार दाखल असलेल्या मोबाईल पैकी वेगवगेळ्या कंपनीचे एकूण ५२ मोबाईल फोन चालू बाजारभावानुसार सुमारे १३,०००००/-(तेरा लाख रुपये )किमतीचे वेगवेगळ्या ठिकाणावरून राज्य परराज्य आळेफाटा पोलिसांनी शोधुन काढले आहे .सदर मोबाईल फोन चे नागरिकांचे गहाळ झालेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन वाटप करण्यात येणार आहे .तरी ज्यांचे मोबाईल फोन असेल त्यांनी मोबाईलचे बिल दाखवून लवकर घेऊन जावे असे आवाहन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांनी केले आहे .सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर ,सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर ,सायबर पोलीस निरिक्षक उमेश तावसकर ,सुनिल कोळी ,अमित माळुंजे,सचिन कोबल ,पोलीस मित्र अमित घोगरे यांनी केली .

Share this content:
