सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
आळेफाटा (ता.जुन्नर ) येथील एस टी स्टँडवर भरदिवसा सणासुदीच्या काळात चोऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .रक्षाबंधन च्या दिवशी आळेफाटा बस स्थानकावर एका महिलेच्या पर्स मधून चोरट्यांनी त्यांचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याची फिर्याद आळेफाटा स्थानकांत करण्यात आली होती . सदर गुन्ह्याचा तपास करीत असता गोपनीय बातमीदार मार्फत माहीती असता पोलीस पथकाने सापळा रचून दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले.त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असता त्यांच्या कडून सुमारे २.५००००किंमतीच्या (३८.५ ग्रॅम )वजनाचे सोने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची इंडिगो कार तसेच चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक एस .बी होडगर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर ,सहा फौजदार चंद्रा डुंबरे ,विनोद गायकवाड ,पंकज पारखे ,अमित पोळ ,अमित माळुंजे,नवीन अरगडे ,सखाराम झुंबड ,विष्णू दहिफळे ,शैलेश वाघमारे यांनी केली .
Share this content:
