

खेड/चाकण प्रतिनिधी- किशोर बोरसे
खेड तालुक्यातील औद्योगिक नगर चाकण येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व नेहरू बालक मंदिर या ठिकाणी उत्साही वातावरणामध्ये लक्ष फाउंडेशन व खानदेश मित्र परिवार चाकण यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये हृदय तपासणी , शस्त्रक्रिया हाडांची तपासणी , शस्त्रक्रिया गुडघ्यांचे खुळा तपासणी शस्त्रक्रिया, कांन, नाक घसा तपासणी नेत्र तपासणी व मोतोबिंदू शस्त्रक्रिया अशा वेगवेगळ्या आजारांवरती मोफत अशी तपासणी करण्यात आली. यावेळी चाकण व परिसरातील अनेक लोकांनी या तपासणीचा फायदा घेतला आहे. यावेळी आदर्श डॉक्टर प्रवीण बडे आणि त्यांच्या सर्व टीमने अगदी व्यवस्थित असे तपासणी वगैरे केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी रोशन दादा मराठे संस्थापक अध्यक्ष लक्ष फाउंडेशन, कालिदास दादा वाडेकर संस्थापक अध्यक्ष पुणे जिल्हा छत्रपती प्रतिष्ठान , पत्रकार किशोर बोरसे, खानदेश मित्रपरिवार चे सर्व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन खानदेश मित्र परिवारांनी केले रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा ही संकल्पना जोपासली असल्यामुळे सर्व स्तरावरून या खानदेश मित्र परिवाराचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे कौतुक होत आहे.
Share this content:
