

खेड/रेटवडी
प्रतिनिधी दत्ता भगत
रोटरी क्लब ऑफ निगडी चारिटेबल ट्रस्ट च्या वतीने श्रीधरराव वाबळे पाटील विद्यालय रेटवडी या विद्यालयासाठी सायन्स लॅब साहित्य व टेबल ,संगणक लॅब साठी पाच संगणक व टेबल मुलींसाठी सॅनेटरी नॅपकिन मशीन व वेंडिंग मशीन प्रदान करण्यात आले त्याचा उद्घाटन समारंभ आज सोमवार दिनांक 24/ 2/ 2025 रोजी विद्यालयांमध्ये साजरा करण्यात आला याप्रसंगी रोटरी क्लबऑफ निगडीचे पदाधिकारी रोटरीयन अश्विन कुलकर्णी , पीसीएल कंपनीचे चेअरमन अनिल कुलकर्णी, रोटरियन जयश्री कुलकर्णी, मुकुंद मुळे अश्विन कुलकर्णी ,धनश्री कुलकर्णी पीसीपीएल कंपनीचे चेअरमन श्री अनिल कुलकर्णी , मंगेश शिर्के उपस्थित होते याप्रसंगी बोलताना चेअरमन श्री अनिल कुलकर्णी यांनी विद्यार्थी जीवनामध्ये विज्ञानाला किती महत्त्व आहे हे स्पष्ट केले आपणही ग्रामीण भागातून शिकलो असल्यामुळे लहानपण जीवन कसे आहे हे आपण जवळून पाहिले आहे अंध मुलींचा अनुभव सांगत असताना ती मुलगी आय ए एस अधिकारी झाली हे सांगताना त्यांचे अंतःकरण भरून आले त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन आपणही मोठे व्हावे हे स्पष्ट केले या कार्यक्रमासाठी श्री रोकडोबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माणिकराव वाबळे, संचालक शिवाजीराव वाबळे ,वामनराव पवळे, दौलतराव वाबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदर्श रामदास पवार, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामचंद्र कोहिनकर यांनी केले आभार प्रदर्शन विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक रामदास पवार यांनी केले
Share this content:
