





प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
ग्रामपंचायत वडगाव येथील बोलक्या अंगणवाडीचे उद्घाटन माननीय श्री गजानन पाटील साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत वडगाव घेनंद येथील कृषी अधिकारी श्रीमती सोनाली पवार मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वाडेकर /साबळे एस पी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 15 व्या वित्त आयोगातुन बोलकी अंगणवाडी करण्यात आली. माननीय श्री गजानन पाटील साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलकी अंगणवाडी केंद्र वडगाव घेनंद या अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने माननीय श्री.चंद्रकांत वाघमारे साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे. माननीय विजय नलावडे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू मॅडम, माननीय विशाल शिंदे साहेब गट विकास अधिकारी , माननीय सुनील भोईर सहाय्यक गट विकास अधिकारी, माननीय सुखदेव साळुंखे साहेब विस्तार अधिकारी ,माननीय अनिकेत पालकर प्रकल्प अधिकारी साहेब खेड -2 आयसीडीसी खेड – 2 अंगणवाडी पर्यवेक्षिका माननीय वाघ एस. ए.मॅडम,कृषी अधिकारी सोनाली पवार मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी वाडेकर /साबळे एस. पी. मॅडम,अंगणवाडी सेविका श्री लता गोसावी, अंगणवाडी मदतनीस मनीषा रसाळ, याप्रमाणे अधिकारी उपस्थित होते. माननीय श्री गजानन पाटील साहेब यांनी बोलक्या अंगणवाडीचे उद्घाटन केल्यानंतर अंगणवाडी तील विविध उपक्रमांची माहिती घेतली व केलेल्या कामाचे कौतुक केले.या कार्यक्रमाला महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Share this content:
