प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले



चास कमान धरण जलाशयाला लागूनच असलेल्या डोंगरावर स्वयंभू शंभू महादेवाचे पुरातन मंदिर आहे. बिबी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी येथील सर्व शिवभक्त ग्रामस्थानी महाशिवरात्री निमित्त मंदिरात भव्य उत्सवाचे आयोजन केले होते. पुजारी जयवंत कोशे यांनी पहाटे शिवभक्त ग्रामस्थ बाबुराव भोर, पोलिस पाटील संतोष भोर, रवींद्र राखुंडे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला.दिवसभरात हजारो शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. येणाऱ्या भक्तांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी सर्व ग्रामस्थांनी आणि शिवभक्तांनी मिळून भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.गुंडाळवाडी परिसरातील डोंगरावरील हे स्वयंभू शंभू महादेवाचे पुरातन देवस्थान असल्याने महा शिवरात्रीचे निमित्त साधून अनेक श्रद्धाळू आवर्जून दर्शनासाठी आले होते.शिवभक्त सोमनाथ इचके यांनी मंदिरास उत्तम फुलांची आरास केली होती.शंकर गुरव हे पारंपरिक पद्धतीने देवाची, मंदिराची आणि परिसराची देखभाल करतात. असा महाशिवरात्रीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात सरपंच सोनाबाई दोरे, मा. सरपंच अरुण गुंडाळ, कैलास असवले, सुरेश जैद, गणेश राखुंडै,महेश राखुंडे,विकास जैद ,दिपक कालेकर उपसरपंच ग्रामस्थानी पुढाकार घेतला होता.
Share this content:
