प्रतिनिधी सुदर्शन मंडले आळेफाटा – क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बी.जे.महाविद्यालयातील विद्यार्थी करत आहेत सायबर जनजागृती.दिनांक १५/०८/२०२५ आळेफाटा पोलिस स्टेशन येथे सायबर सुरक्षिततेवर माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.बी.जे.महाविद्यालय व क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबवित असलेल्या “सायबर शिक्षा फाॅर सायबर सुरक्षा” या प्रकल्पांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थिनी शुभांगी माळी आणि चौधरी सानिका यांनी सर्व पोलिस स्टेशन मध्ये सायबर सुरक्षा व माहिती तंत्रज्ञान युगात इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती देऊन सायबर जगतात सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक बाबींची ओळख करून दिली.सदर विद्यार्थिनींनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर व इंटरनेटचा वापर करताना काय काळजी घेतली पाहिजे हे उदाहरणासह समजून सांगितले. या विद्यार्थिनींच्या कामाचे कौतुक केले व विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. बी.जे. महाविद्यालयातील बीसीएस विभागातील विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट संवाद साधत विद्यार्थ्यांच्या शंकांचे देखील याप्रसंगी निरसन केले त्याचप्रमाणे असे स्तुत्य उपक्रम क्विक हिल फाउंडेशन व बी.जे.महाविद्यालय राबवत आहे याबद्दल सर्वांनी देखील कौतुक केले
Share this content:
