


प्रतिनिधी- मनोहर गोरगल्ले
खरपुड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी आठ वाजता गावातुन प्रभात फेरी काढल्यात आली.त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी ध्वजारोहण खरपुड गावचे लोकनियुक्त सरपंच तानाजी भोकटे, उपसरपच संतोष मदगे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजु फुलवरे , शिक्षक गणेश सुतार ,विजय नाईक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता सागंडे ग्रामविकास अधिकारी रिना राजुरकर अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामस्थ, पालक, महिला, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी एकल महीलांनां सन्मानाची वागणूक व सन्मान दिला जाईल अशी प्रतिज्ञा ग्रामस्थ विद्यार्थी व सर्व उपस्थितांनी घेण्यात आली.
Share this content:
