
प्रतिनिधी- दत्ता भगत
खेड/निमगाव खंडोबा
खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव खंडोबा नगरी मध्ये सहाच्या दरम्यान शेतकरी श्री शांताराम नारायण काळे यांच्यावर बिबट्याने जबरी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये त्यांच्या डोक्यावरती गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली.त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय चांडोली ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले.त्यांनी प्राथमिक उपचार करून एकंदरीत पेशंटची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी वाय.सी.एम हॉस्पिटल पुणे या ठिकाणी त्यांना हलविण्यात आले आहे . खेड तालुका शरदचंद्र पवार गटाचे सेलचे अध्यक्ष श्री मोहन भगत यांनी त्वरित पिंजरा बसवण्यात यावे अशी मागणी केली आणि बिबट्यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. निमगाव आणि परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Share this content:
