प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
मुंबई : अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडून मार्च २०२५ पासून एम.एच.१६ सीडी.५८५७ ( इनोव्हा क्रिस्टा) पांढऱ्या रंगाची गाडी ( MH.16.CD.5857 ) या सरकारी वाहनाचा गैरवापर केला जात असून त्यांची पत्नी नातेवाईकांकडे जाण्यासाठी व स्व:ताच्या खाजगी कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या गाडीचा गैरवापर करत असून अनेक वेळा ही गाडी नगर शहरा सह कापड बाजार, भाजी मार्केट या परिसरात दिवस भर फिरताना दिसते , ही गाडी अहिल्या नगर जिल्ह्या बाहेर ही फिरत असते जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ.पंकज आशिया हे स्वतःच्या मुलांना वाडिया पार्क मैदान, जॉगिंग पार्क मैदान नगर, व इतर मैदानावर खेळायला पाठवतात मुलांना मैदानावर सोडवण्यासाठी MH.16.CD.5857 या सरकारी गाडीचा वापर केला जातो मुलांना दररोज संध्याकाळी मैदानावर खेळायला नेले जाते मुलांचे खेळून होई पर्यंत सरकारी गाडी मैदानावर पार्किंग (उभी ) केली जाते लहान लहान मुले असल्याने त्यांचा सांभाळ करण्यासाठी मैदानावर सरकारी कर्मचारी महिलांना पाठवतात सरकारी वाहनाचा गैरवापर हा गंभीर गुन्हा आहे, सरकारी कामाशिवाय इतर कामांसाठी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी व मुलांना फिरण्यासाठी सरकारी वाहनाचा वापर केल्याचे पुरावे मैदानावरील जीपीएस (GPS) कॅमेरे ने काढलेले फोटो व व्हिडिओ तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ. पंकज आशिया यांच्या पत्नी या महाराष्ट्र शासनाची गाडी MH.16.CD.5857 ही घेऊन
कापड बाजारात खरेदी करतानाचे जीपीएस (GPS) कॅमेरे ने काढलेले व्हिडिओ व फोटो पुरावा म्हणून उपलब्ध आहेत यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान होत असल्याने याची आपल्या कार्यालयाने गंभीर दखल घेऊन गैरवापर प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमावी , गैरवापर गंभीर असल्याने जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ. पंकज आशिया यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ निलंबित करावे गैरवापर केलेला दंड वसूल करून वेतन वाढ रोखण्यात यावी , गैरवापर गंभीर असल्याने जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ . पंकज आशिया यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणी चे पत्र सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे दिले असून २० दिवसांत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यावर कारवाई न केल्यास सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे
Share this content:
