


प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
20 ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी १८९७ मध्ये डासांमुळे मलेरिया पसरतो हे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले, त्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आयुष्मान आरोग्य मंदिर राजगुरुनगर येथे वैद्यकीय अधिकारी डाॅ अशोक मैंदाड व डाॅ इंदिरा पारखे यांच्या मार्गदर्शना खाली सदर दिवस साजरा करण्यात आला.आरोग्य सहायक श्री भूषण भारती,महेश दहिवळ,दिपक शेलार यांनी समस्त ग्रामस्थांमधे डास व त्यापासुन होणारे आजार याबद्दल जनजागरण केले.तसेच आरोग्य सेवक चंद्रशेखर जाधव,प्रतिक गवारी,चंद्रकांत पंचरास,रोहन कोळपकर,दिपक भुसारी,अल्पेश महाकाळ यांनी राजगुरुनगर बसस्थानक आणि हुतात्मा राजगुरु विद्यालय राजगुरुनगर येथे प्रवासी व शिक्षक विद्यार्थ्यांना डास व आजार प्रतिबंध व उपचार यांची माहिति दिली.अधिक समतापूर्ण जगासाठी मलेरिया विरुद्धच्या लढाईला गती देणे असे जागतिक डास दिन २०२५ ची थीम घेवुन हा कार्यक्रम राबविण्यात आला.डासांपासुन होणार्या रोगांसाठी प्रतिबंध,निदान व उपचार यांवर भर देण्यात आला..
Share this content:
