

प्रतिनिधी संतोष गाडेकर राजगुरुनगर:- ता. खेड आज २४. ऑगस्ट हुतात्मा शिवराम हरी राजगुरू ११७ वी. जयंती उत्साहात साजरी करण्यात आली राजगुरू वाडा यांच्या जन्मस्थळी, व सकाळी ९ -१५ वाजता राजगुरुनगर येथे एसटी स्टँड येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव येथे पुतळ्यासमोर मानवंदना सलामी, राष्ट्रगीत, पोवाडे, गायले राजगुरू वाडा स्मृतिस्थळी १० वा. कार्यक्रम झाला.
राजगुरू वाडा येथे भीमा तीरी त्यांच्या जन्म स्थळी ठिकाण येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जवळचे नाते संबंध असणारे श्री सत्यशील राजगुरू यांच्या उपस्थितीत मानवंदना सलामी राष्ट्रगीत झाले. , सैनिकी विद्यार्थी पथक, पथकांच्या माध्यमातून सलामी देण्यात आली हुतात्मा शिवराम हरी राजगुरू फाउंडेशन, हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठान हुतात्मा राजगुरू सेवाभावी संस्था, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू महाविद्यालय, हुतात्मा राजगुरू विद्यालय, हुतात्मा राजगुरू माऊली प्रतिष्ठान, हुतात्मा राजगुरू फाउंडेशन विविध संस्था व संघटनेच्या माध्यमातून हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना पुष्प चक्र सलामी ,अभिवादन केले राजगुरू वाडा यांच्या जन्मस्थळी राजगुरुनगर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी सायकल रॅली, केले होते त्यावेळी सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले , हुतात्मा राजगुरू फाउंडेशन यांच्या वतीने चंद्रमा मंगल कार्यालय येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या नावाचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न करण्यात आला.
सकाळी ९-१५ वा. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती कार्यक्रमाची सुरुवात झाली माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील, आमदार बाबाजी शेठ काळे,अतुल भाऊ देशमुख,(. जिल्हा परिषद सदस्य). विजयसिंह शिंदे ( कृ .उ .बाजार समिती खेड तालुका ) प्रकाश वाडेकर, युवा नेते मृण्मय काळे मारुती सातकर, सौ,राज माला बुट्टे रेखाताई क्षत्रिया, उर्मिला ताई सांडभोर , सर्व महिला , गणेश सांडभोर सुदामराव कराळे (निवेदक) किशोर ओसवाल, मंगेश गुंडा ळ, अशोक दुगड, सुशील मांजर, राजगुरुनगर नगरपरिषद नगराध्यक्ष व नगरसेवक, राक्षेवाडी सरपंच व उपसरपंच,सदस्य हुतात्मा राजगुरू महाविद्यालय येथील प्राचार्य शिरीष पिंगळे सर व उपप्राचार्य सर्व प्राध्यापक व शिक्षक कुंडलिक कोहिनकर, मुकुंदा आवटे भाऊ भालेकर कोंडीबा टाकळकर , वैभव नाईकरे भाऊसाहेब भालेकर ,राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक पत्रकार आजी-माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जयंती कार्यक्रम संपन्न करण्यात आला
Share this content:
