
प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
रामभाऊ म्हाळगी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक रामदास रेटवडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने या वर्षाचा जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराने रामदास रेटवडे यांना सन्मानित करण्यात आले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे
शिक्षण विकास मंडळ संचालित रामभाऊ म्हाळगी विद्यालयचे क्रीडा शिक्षक रामदास रेटवडे म्हणून अनेक वर्ष सेवा करित आहे. तसेच खेड तालुक्यात क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष म्हणून गेली ९ वर्ष काम करीत आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले आहे. जिल्हास्तरावरील गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार. सोहळा सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन पुणे याठिकाणी संपन्न झाला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सहाय्यक क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, तालुका क्रीडा अधिकारी अश्विनी शिवानंद हत्तरंगे, चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चे प्राचार्य अफताब अन्वर शेख, कॉलेजचे संस्थापक ताहेर आसी यांच्या शुभहस्ते जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रामदास रेटवडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण विकास मंडळ चे अध्यक्षअशोक गारगोटे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढमाले संचालक प्रकाश कालेकर संजय जाधव योगेश धायबर प्राचार्य अनिल पोटे सर्व अधिकारी वर्ग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.
Share this content:
