


प्रतिनिधी-मनोहर मनोहर गोरगल्ले
सी आय ई ऑटोमेटिव्ह इंडिया लिमिटेड,
चाकण,आंबेठाण (फोर्जिंग डिव्हिजन) आणि इ से प टीमच्या वतीने आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या.
सामाजिक बांधिलकी जपत सी आय ई ऑटोमेटिव्ह इंडिया लिमिटेड, चाकण,आंबेठाण (फोर्जिंग डिव्हिजन) आणि इ से प टीमच्या वतीने अनेक शाळेतील मुलांना स्कूल बॅग,शैक्षणिक साहित्य, स्वेटर व इत्यादी अनेक साहित्य वाटप करण्यात आले आहेत. आज या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या.हा उपक्रम श्री सुनील नरके सर (CEO),श्री प्रदीप चौगुले (एच आर हेड) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश खिंड केंद्र कडूस तालुका खेड जिल्हा पुणे येथील शाळेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग ३५ वाटप करण्यात आले . स्कूल बॅग मिळाल्याबद्दल विशेष म्हणजे त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाला खूप समाधान वाटलं की आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत आणि केलेच पाहिजे.या वेळी
खालील प्रमाणे मान्यवर उपसस्थिती होते.
श्री अनिल काला सर श्री शिवाजी कारले श्री. एकनाथ मोरे श्री संजय मानकर श्री अर्जुन जाधव श्री छत्रपती इंगोले श्री सोमनाथ साळुंके श्री रमेशहोले त्याच प्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश खिंड शिक्षक श्री रवींद्र निंबाळकर,सरपंच ॲ. श्री सत्यवान वाळुंज, सौ. डॉ. प्रमिला बांबळे आणि डॉ.दिलीप बांबळे यांचे शालेय समिती अध्यक्ष यांनी आभार मानले आणि कंपनीची भरभराटी होवो असा आशीर्वाद दिला.
तसेच अनिल काला सर यांने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाबद्दल संबोधित केले आणि सर्वांना दिवाळीच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या.
Share this content:
