
प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
कुरुळी/आळंदी: आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून सौ. इंदिराताई निलेशदादा थिगळे यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. ही जागा सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी (सन २०२५-३०) आरक्षित असून, त्यांच्या प्रवेशाने या गटातील निवडणुकीला नवा रंग चढला आहे.सौ. इंदिराताई थिगळे यांनी महिलांच्या विकासाला आणि सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प केला आहे.”महिलांच्या विकासाची,सक्षमीकरणाची एक नवी सुरुवात!” या घोषवाक्यासह त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्यासह खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ इंदिराताई निलेशदादा थिगळे यांच्या उमेदवारीला एका मोठ्या राजकीय पाठबळाची जोड असल्याचे स्पष्ट होते. सौ. इंदिराताई थिगळे या निलेशदादा थिगळे यांच्या पत्नी असून, त्यांच्या माध्यमातून कुरुळी-आळंदी गटात सक्रिय व प्रभावी नेतृत्व देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण (महिला) गटासाठी होणारी ही निवडणूक परिसरातील महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.सौ. इंदिराताई निलेशदादा थिगळे या कुरुळी – आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद.गटात
आरक्षण/प्रवर्ग: सर्वसाधारण (महिला).निवडणूक कालावधी: सन २०२५-३० निवडणूकीसाठी उभे राहणार असून त्यांचे लक्ष्य: महिलांचा विकास आणि सक्षमीकरण करणे असुन या उमेदवारीमुळे कुरुळी-आळंदी गटातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Share this content:
