
प्रतिनिधी : उत्तमराव खेसे
खेड [ कडधे ] : ता . १२ / १० : वैष्णवांची फळी उभी करायला .खेड तालुका अखंड हरिनाम सप्ता कडे तालुक्यातील १८६ गावांपैकी ७० गावातील ह. भ. प. महाराज मंडळींना प्रवचन आणि कीर्तनाचा मान मिळाला .हे ऐकटयाचे काम नव्हे .हा ऐकल्याचा खेळ नव्हे . कडधे येथील अखंड हरिनाम सप्ताहासाठी अनेक लोकांचे सहकार्य लाभलेले आहे .हा राजकीय लोकांच्या शिवाय हा अखंड हरिनाम सप्ताह पार पडलेला आहे .हा सप्ताह तालुक्यातून कडधे जय मल्हारच्या पावन स्पर्शाने झालेल्या भूमीमध्ये संपन्न झाला आहे .या साठी खेड तालुक्यातील चारही दिशेकडील सर्व थरातून सामान्य माणसाची मदत झालेली आहे .कडधे गावातील ग्रामस्थांचे मोठे सहकार्य आहे .
एवढ्या गावातून सहकार्य होते तिथे एकटा माणूस काहीच करू शकत नाही .
तालुक्यातील तमाम लोकांचे यासाठी देणगी , श्रम , मंडप , डेकोरेशन या गोष्टीच्या रूपात मदत झाली आहे .रोज सात दिवस चार ते पाच हजार भाविक भक्तांनी विविध ह.भ.प. महाराज मंडळीचं कीर्तन ऐकण्यास मिळत असे .यांचे नियोजन आयोजन करणे हे एकट्या माणसाचं काम नाही यासाठी सर्व मंडळींचं सहकार्य मिळालेला आहे .
ह. भ. प. भरत महाराज थोरात यांनी काल्याचे किर्तन कडधे येथे सादर करताना सांगितले .
ह. भ. प. श्रीपती कुडेकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला . पुरस्कारांचे वितरण खेड तालुक्याचे आमदार श्री बाबाजीशेठ काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
या काल्याच्या कीर्तनासाठी खेड तालुक्याचे आमदार श्री बाबाजी शेठ काळे यांनी ही देणगी देऊन अखंड सप्ताहासाठी जे सहकार्य लागले ते ह. भ. प. मंडळींना केले जाईल असे सांगितले. सप्ताह मंडप साठी जनसेवक संजयभाऊ घनवट ,जनसेवक सुधीर भाऊ मुंगसे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांचे सहकार्य लाभले .अनेक सामान्य लोक ते दिग्गज लोक यांची 25 हजार रुपये ते लाखो रुपया पर्यंत मदत या सप्ताहासाठी केली .सर्व देणगीदार सहकारी सगळा हिशोब आपापल्या मोबाईल वरती सांगितला जाईल असे ह. भ. प. भरत महाराज थोरात यांनी सांगितले .
तालुक्यातील बंद पडलेले सप्ताह चालू केले जातील .
या सप्ताहाच्या कालावधीमध्ये 749 लोकांची आरोग्य तपासणी झाली .नेत्र तपासणीचे हे आरोग्य शिबिर घेतले गेले .निदान झालेल्या वरती उपाय योजना ही केली गेली व पुढील मार्गदर्शन ही करण्यात आले आहे .
Share this content:
