
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
राजगुरुनगरची कु. गेहेना शिंगवी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पात्र झाली आहे.राजगुरुनगर खरपुडी येथील के.डी.चौधरी पाटील इंग्लिश मीडियम खरपुडी या स्कूलची विद्यार्थिनी गेहेना अजय शिंगवी हिने विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र झाली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे झालेल्या विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत गेहेना हिने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. के.डी.चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष के. डी. चौधरी पाटील तसेच व्हा. प्रिन्सिपल सौ.रोहिणी गव्हाणे व शिक्षक वृंदांच्या वतीने गेहेना हिचे हार्दिक अभिनंदन करून तीला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच तिला हे यश मिळवल्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
Share this content:
