
प्रतिनिधी :उत्तमराव खेसे
पोमगाव [ पोमगाव ] ता . ३ डिसेंबर :
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे .घेणाऱ्याने एक दिवशी देणाऱ्याचा आदर्श घ्यावा . या म्हणी प्रमाणे पोमगाव या विद्यालयात वस्तीग्रहात २४ विद्यार्थी शासकीय रोस्टर प्रमाणे निवासी आहेत .
जो शिकेल तो दुनियात टिकेल ,शिक्षणाला फार महत्त्व आहे .गरिबांची मुलं या वस्तीगृहात निवासी असून
मुळशी धरण प्रशाला पोमगाव विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतात .लेखन , वाचन , शिस्त आणि शिक्षण ही चार सूत्री याचे अवलोकन करूनविद्यार्थी घडत असतो .मैदानी खेळा च्या माध्यमातून विद्यार्थी तंदुरुस्त होतो .सेवाभावार्थ संस्था शाळेतील विधार्थी यांच्या साठी काही भौतिक सुविधा देत असतात .
योगासाठी मॅट ,खेळाचे साहित्य इ .उपयोगी साहित्यसेवार्थ फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्या माध्यमातून भेटलेल्या आहेत .कमी पडल्या तरी अजूनही ते देणार आहेत .वस्तीगृहाची चाललेली इमारत दुरुस्ती ,सोलर प्लांट याचे सर्व बजेट काढूनपाहणी करून पुढील कारवाई लवकरच करणार आहे .सेवार्थ फाउंडेशन व रोटरी क्लब पुणे यांचे पदाधिकारी उपस्थित होते . प्राईड अध्यक्ष अनिल सर – रोटरी क्लब पुणे संपदा कुंठे मॅडम – सेवार्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या सचिव विनोद पाटील – आरसीसी सेवार्थ फाउंडेशनचे अध्यक्षमार्था फिन मॅडम – आरसीसी सेवार्थ फाउंडेशनच्या सचिव प्रदीप पाटील – सेवार्थ फाउंडेशनचे सचिव मयुरेश खिस्ती – सेवार्थ फाउंडेशनचे सदस्य सचिन जगदाळे – सेवार्थ फाउंडेशनचे सदस्य स्वप्नील कांबळे – सेवार्थ फाउंडेशनचे सदस्य संदीप चव्हाण – सेवार्थ फाउंडेशनचे सदस्य दीपेश पितळे – सेवार्थ फाउंडेशनचे सदस्य योगेश पाटील – सेवार्थ फाउंडेशनचे सदस्य
मुख्याध्यापक बी एम सोनवणे , शिक्षक बी एल वाकचौरे , राजेंद्र नाईकरे, किरण धायगुडे, काळे मामा , विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
Share this content:
